आत काही दाटले अंधारसे
शब्द माझ्या अंतरीचे आरसे
ही अवस्था कोणती सांगू कसे?
नाही तिचे कोणीच केले बारसे
जाऊ दे ना ही लढाई संपली
संपले कोठे लढाऊ वारसे
मध्यरात्रीला निमाला तो दिवा
वातीस उरले तेल नव्हते फारसे
स्मरते मला ती वेळ सायंकाळची
दोन तारा बोलल्या गंधारसे
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
प्रिय अदिती,
जवाब देंहटाएंईंटरनेटवर सहज मुशाफिरी करता करता तुझा ब्लॉग नजरेस पडला ! फार छान आहेत गं तुझ्या कविता. आशयगर्भ आणि शब्दांवरची हुकुमत दाखवणाऱ्या. तुझ्यासारख्यांनी खरं तर कवितांचं पुस्तक छापलं पाहिजे ... अशा ब्लॉगवर नको ठेवूस असं मनापासून वाटलं ...
अश्विनी ...
सुंदर!
जवाब देंहटाएंमध्यरात्रीला निमाला तो दिवा
वातीस उरले तेल नव्हते फारसे
स्मरते मला ती वेळ सायंकाळची
दोन तारा बोलल्या गंधारसे
विशेष आवडले.
अदिती,
जवाब देंहटाएंकाव्य आवडले. मात्र गझल म्हणून लिहिले असशील तर काही ठिकाणी वृत्तात घोळ झाल्यासारखा वाटतोय. त्यात दुरुस्ती केल्यास सुंदर गझल होईल. जसे,
नाही तिचे कोणीच केले बारसे
च्या ऐवजी
ना तिचे कोणीच केले बारसे
वातीस उरले तेल नव्हते फारसे
ऐवजी
तेल वातीला न उरले फारसे,
अथवा अर्थछटेत थोडा बदल करून
वात थकली, तेल नव्हते फारसे
स्मरते मला ती वेळ सायंकाळची
ऐवजी
वेळ संध्याकाळची ती आठवे
किंवा
वेळ संध्याकाळची स्मरताच ती