आवाज ना कुणाचा
ही शांत सावली
ही झुळूक नाचरी
खुळी आकाशबावरी
तिची निळीशी काया
तरल सचेतन स्पर्श
फुलाफुलावर फिरते
कणाकणात शिरते
तो पिंपळ हिरवासा
हसतो सोडून मौन
चमचमणाऱ्या टिकल्या
जीर्ण पालव्या पिकल्या
जाते उडवून खट्याळ
उंच टोपी माडाची
खुद्कन आंबा हसतो
तिथे शेवगा रुसतो
ती जाते अल्लड तेंव्हा
एक उसासा सुटतो
मन क्षणभर बावरते
तिला पुन्हा आळवते
करकरत्या खाटेवरती
पुन्हा लागते डुलकी
ती स्वप्नी येऊन जाते
पण खुणा सोडून जाते....
--अदिती(१७.१०.०६)
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Hi kavita konachi?
जवाब देंहटाएं-marathimedley.blogspot.com
chhaan.
जवाब देंहटाएंतो पिंपळ हिरवासा,हसतो सोडून मौन
चमचमणाऱ्या टिकल्या, जीर्ण पालव्या पिकल्या.
- yaa oLee visheSh aavaDalyaa. halakech saLasaLaaNaaraa pimpaL DoLyaasamor ubhyaa karaNaaryaa.