18 अगस्त 2010

मावसबोलीतील कविता

नंदनने मला या खेळातला खो देऊनही बरेच दिवस झाले. विविध कारणांमुळे मला हे भाषांतर इथे प्रकाशित करायलाही उशीर झाला. पण बेटर लेट दॅन नेव्हर असं म्हणत हे छापते आहे. हे गाणं म्हणताना / ऐकताना मला माझ्या अनेक बालमित्रांची, जालमित्रांची आणि (पांढरे!) बाल मित्रांची नेहमीच आठवण होते. हे कोणाला अर्पण वगरे करण्याइतकं सुरेख झालेलं नाही तरी पण ज्या अनेक लोकांच्या मैत्रीमुळे, सौहार्दामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं त्या लोकांसाठी माझ्याकडून ही फूल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्यावी.



कधीच जे भंगणार नाही, मैत्र आपुले असेच राहो,
दिवस आजचा स्वप्नी जपुनी, मनोरथांच्या वाटा चालू
दिगंतराला पक्षी जाती, तसे नभाला लंघुन जाऊ
आज घेतला निरोप तरिही, पुढच्या भेटीचीच वाट पाहू
आज घेतला निरोप तरिही, पुढच्या भेटीचीच वाट पाहू
घडल्या भेटींची अवीट गोडी काळिज-कुपीत जपून ठेवू,
आज घेतला निरोप तरिही पुढच्या भेटीचीच वाट पाहू,
पुढच्या भेटीचीच वाट पाहू

मूळ जपानी कविता रोमन लिपीत अशी लिहिली जाईल...
Tomodachi de iyou
Asu no hi wa yume mite
Kibou no michi wo

Sora wo tobu tori no you ni
Jiyuu ni ikiru
Kyou no hi wa sayonara
Mata au hi made

Kyou no hi wa sayonara
Mata au hi made

Shinjiau yorokobi wo
Taisetsu ni shiyou
Kyou no hi wa sayonara
Mata au hi made

Mata au hi made

--अदिती
(१८ ऑगस्ट २०१०, श्रावण शु. ९ शके १९३२)

1 टिप्पणी: